loader
Breaking News
Breaking News
Foto

भरवस्तीत आलेल्या विषारी सर्पाला पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मधलीवाडीनजीक सुतारवाडी येथे भर वस्तीत आलेल्या आग्या घोणस या विषारी सर्पाला जीवंत पकडून यश वर्दम आणि संकेत फोंडेकर या सर्पमित्रांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. कणकवली शहरातील सुतारवाडी येथील श्री. चिंदरकर यांच्या घरानजीक सर्प आढळून आला. घरालगतच्या एका पत्र्यामागे हा सर्प लपून राहिला होता. याबाबत सर्पमित्र यश वर्दम या युवकाला कळविल्यानंतर तो तेथे दाखल झाला. सदरचा सर्प म्हणजे आग्या घोणस जातीचा विषारी सर्प होता. यश वर्दम आणि संकेत फोंडेकर या दोघांनी आपल्यासोबतच्या सर्प पकडण्याच्या शिगेने हा सर्प शिताफीने एका बरणीत कैद करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts