loader
Breaking News
Breaking News
Foto

केर गावात जंगली हत्ती कळपाने केले बागायतीचेे नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोर्‍यातील अनेक गावात जंगली हत्ती कळपाकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. एक हत्ती होता या पाठोपाठ लहान पिल्लासह आणखी पाच हत्ती कळप दाखल झाला आहे. हा कळप घाटीवडे बांबर्डे सोनावल, मोर्ले, केर, गावात धुमाकूळ घालत आहे. हा कळप हेवाळे गावात येऊ नये यासाठी वनविभाग पथक दिवसरात्र घाटीवडे बांबर्डे येथे तैनात आहे. दिवसाढवळ्या हा कळप धुमाकूळ घालत आहे. यामुळे बाहेर पडणे अवघड झाले आहे. असे असताना शनिवारी भल्या पहाटे हत्ती थेट केर गावात दाखल होऊन येथील शेतकरी चंद्रकांत देसाई व इतरांचे मोठे नुकसान केले. आता बस्स झालं एवढी वर्षे सहन केले. पण यापुढे शक्य नाही. वनविभाग यांनी हत्ती पकड मोहीम बाबत हालचाली सुरू कराव्या अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोर्‍यातील अनेक गावात उन्हाळी शेती हंगाम तसेच काजू हंगाम दरम्यान हत्ती कळप नुकसान करत आहे. यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. वन कर्मचारी आपल्या परीने जंगली हत्तीकडून शेती बागायती नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करतात पण याना गुंगारा देत हत्ती कळप शेती बागायतीमध्ये शिरकाव करून नुकसान करत आहे. शनिवारी पहाटे जंगली हत्ती केर गावात दाखल झाला. कुञ्याच्या भुंकण्याने लोक जागे झाले. तर हत्ती चंद्रकांत देसाई यांच्या बागेत मोठ्या प्रमाणात केळी झाडांचे नुकसान केले. काही मोठे माड देखील आडवे केले. यामुळे देसाई यांचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभाग यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले? जंगली हत्ती कळप टस्कर हत्ती यांचा उपद्रव रोखण्यासाठी आता हत्ती पकड मोहीम हाच पर्याय आहे. त्यामुळे हत्ती बाधित गावातून आता वनविभाग यांच्या विरोधात मोठे आंदोलन उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. जंगली हत्ती पकड मोहीम बंदी घातली असा चूकीचा समज लोकात पसरवला. जर केंद्र सरकारने बंदी घातली तर मग कर्नाटक खानापूर येथे ही पकड मोहीम कशी राबवली यशस्वी केली. तेव्हा वनविभाग यांनी वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य सरकार कडे तातडीने हालचाली करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg