loader
Breaking News
Breaking News
Foto

दळे मठवाडी येथे दोन प्रसिद्ध बुवांच्या भजनाचा २०-२० सामना रंगणार

राजापूर (मनोहर धुरी) : राजापूर तालुक्यातील दळे मठवाडी येथे दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा गुंडू सावंत यांच्यात २०-२० भजनाचा जंगी सामना होणार आहे. हे दोन्ही बुवा भजनाचा वारसा गेली अनेक वर्षे जपत आहेत. संदीप लोके हे पहाडी आवाजाचे सम्राट आणि गुंडू सावंत बुवा हे अध्यात्मचे बादशहा म्हणून कोकण, मुंबई परिसरात परिचित आहेत. दोन्ही बुवा भजनातील जाणकार असून शेरास सव्वाशेर बतावणी करण्यास माहीर आहेत. कधी कधी बतावणीमुळे यांची जुगलबंदी जोरात चालते आणि रसिकांची करमणूक होते आणि यावेळी भजनरसिक सुध्दा ‘उडव, तापव, पेटव’ अशा विविध ग्रामीण भाषेत दोन्ही बुवांना प्रतिसाद देतात आणि बुवां मात्र एकमेकांना बतावणीचा ठसका देतात आणि रसिक हसण्याचे काम करतात. मात्र भजन रुपी नामस्मरण जनमानसात कसे रुजेल याकडे ही बुवांचा लक्ष असतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी स्तवन रुपावली आणि ध्यानाचा अभंग गाऊन परमेश्वराचे नामस्मरण विठ्ठलाचे नाम हरीचा गजर होणार आहे आणि अभंगाचा गार्भों गजराचा धमाका आणि गौळणीचा ठसका उडणार आहे. सप्तसुरांची मैफिल रंगणार आहे मात्र यावेळी विनोदी शेलकी बतावणी पखवाज तबला वरील बोटांचा नाद, पेटीचा सूर आणि दोन्ही बुवांचे भजनातील ताल, सूर, अनुभव हे रसिकांना बघायला व ऐकायला मिळणार आहे मात्र यावेळी बतावणीच्या ठसक्याने कानसेन मनमुराद आनंदाने तृप्त होणार यात काही वावगे नाही तरी परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts