loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वयंपाक घरात खाद्यतेल वापर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवाहन

भारतीय नागरिकांनी स्वयंपाकघरात खाद्यतेलाचे सेवन कमी करून लठ्ठपणाशी लढण्यासाठी देशव्यापी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बॉलीवूड अभिनेते, खेळाडू आणि आरोग्य तज्ञ यांनीही निरोगी भारताच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी आपल्या आहारात लहान परंतु प्रभावी बदल करण्याच्या गरजेवर भर दिला. 'आमच्या घरात महिन्याच्या सुरुवातीला रेशन येते. त्यात तेलाचाही समावेश असतो. जर आपण खाद्यतेल दोन लिटर खरेदी केल्यास, त्याचा स्वयंपाकघरातील तेलाचा वापर कमीतकमी 10% कमी करा. आपल्या दैनंदिन आहारात तेलाचा वापर कमी केल्याने आरोग्याच्या समस्या टाळण्यास मदत होऊ शकते, असे ते म्हणाले.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

देशात लठ्ठपणा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तरुणांसह सर्व वयोगटातील लोकांना धोका आहे यावर भर देत पंतप्रधानांनी भारतातील लठ्ठपणाची वाढती चिंता अधोरेखित केली. लठ्ठपणा हा मधुमेह आणि हृदयरोगांना कारणीभूत ठरणारा एक प्रमुख घटक आहे असे नमूद करून त्यांनी राष्ट्राला त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. 'आपल्या देशात लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. तरुणांसह प्रत्येक वयोगटाला याचा फटका बसत आहे. ही चिंतेची बाब आहे कारण यामुळे मधुमेह आणि हृदयाच्या आजारांसारख्या आजारांचा धोका वाढतो', असा इशारा त्यांनी दिला. याच वेळी त्यांनी खाण्यापिण्याच्या सवयी बदला, आरोग्य सुधारा, आयुष्य वाढवा, असा संदेशही दिला. आहारातील बदलांव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना त्यांच्या दिनचर्येत नियमित शारीरिक हालचालींचा समावेश करण्यास प्रोत्साहित केले. 'आज, मी सर्वांना दररोज व्यायामासाठी वेळ काढण्याचे आवाहन करू इच्छितो. मग ते चालणे असो किंवा व्यायाम, तंदुरुस्त राहण्यासाठी काही प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये सहभागी व्हा'

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts