loader
Breaking News
Breaking News
Foto

निर्मला सीतारामन यांचेकडून अर्थसंकल्प आणि दिलासाही : ॲड.विलास पाटणे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यानी अर्थसंकल्प सादर करतांना १२ लाख उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीयाना मोठा दिलासा दिला . शहरासाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी ,ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी आणि डेअरी , मत्स्यपालन स्पेशल झोन यातून विकासाला गती मिळेल .सध्याच्या घडीला किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वार्षिक १२ हजार रुपये केल्याने शेतकऱ्यांना दिलासा. खेळण्याचं हब , लेदर इंडस्ट्री, नॅशनल स्किल सेंटर आणि बिहारमधील मखाना बोर्ड यातून रोजगार वाढेल . स्टार्टअपसाठी दहा हजार कोटीतून युवकांना दिशा आणि रोजगार मिळेल .पन्नास हजार घरातून घर खरेदी करणाऱ्याचे स्वप्न सत्यात येईल.देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा, तरुणांना रोजगार आणि आत्मनिर्भरता निर्माण होईल, असे रत्नागिरी बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड.विलास पाटणे यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts