loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माघी गणेश जयंतीनिमित्त खेडमधील सार्वजनिक गणेशमंदिरात केले श्री गणपती अथर्वशीर्ष पठण.

खेड - प्रतिनिधी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून खेडमधील सार्वजनिक गणेश मंदिरात श्री गणपती अथर्वशीर्ष पठण केले.चौदा विद्या व चौसष्ट कलेचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्ताच्या उत्सवात सालाबादप्रमाणे अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम राखत रोटरी स्कूलमधील इयत्ता 5 री ते 6 वीच्या विद्यार्थ्यांनी श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करून तेथील वातावरण भक्तीमय केले. अचूक शब्दोच्चारण आणि पठणाच्या वेळी आवाजातील लयबद्धता व चढउतार यांनी सर्व भक्तगण अथर्वशीर्ष श्रवणात मग्न झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोटरी स्कूलचे सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुस्पष्ट अथर्वशीर्ष पठण केल्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्याथ्र्यांचे विशेष कौतुक केले आणि यापुढेही अखंडितपणे विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी यावे असे आवाहन केले.रोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल व सर्व शिक्षक यांनी अथर्वशीर्ष पठण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg