loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरात माघी गणेशोत्सवानिमित्त प्रशांत यादवांनी घेतले विधिवत दर्शन.

संगमेश्वर / प्रतिनिधी संगमेश्वर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी दूध डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी संगमेश्वर तालुक्यातील अनेक माघी गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवांना भेटी देऊन विधिवत दर्शन घेऊन गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिले.यावेळी गणेशोत्सव मंडळ,पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला.मी नेहमीच आपल्या बरोबर आहे.असे आश्वासन देखील यावेळी प्रशांत यादव यांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेश जयंती निमित्त सर्वत्र माघी गणेशोत्सव उत्सव सर्वत्र सुरू आहे.अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ तसेच स्थानिक मंडळे हा उत्सव मोठ्या आनंदाने व वेगवेगळ्या कार्यक्रमाने साजरा करत असतात.शुक्रवारी गणेशाचे आगमन झाल्यानंतर शनिवारी पहाटेपासून विधिवत पूजाअर्चा करून हा उत्सव सुरू झाला.संगमेश्वर तालुक्यात देखील अनेक गावात माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट चे चेअरमन प्रशांत यादव यांनी शनिवारी संगमेश्वर तालुक्याचा दौरा केला. संगमेश्वर तालुका माघी गणेश जयंतीनिमित्त तुरळ हरेकरवाडी, कोसुंब मधलीवाडी, उजगाव कानसरेवाडी, तेगडेवाडी पांगरी, वांझोळे सनगलेवाडी, मौजे बेलारीवाडी, देवरुख बाजारपेठ मित्र मंडळ, सिद्धिविनायक नगर देवरुख, विघ्रवली माळवाडी, काटवली ढोसळवाडी, मुचरी गोरेवाडी, सिद्धिविनायक हरिहरेश्वर मंदिर शिवणे, केदारलिंग प्रासादिक मंडळ फणसवणे, औदुंबर प्रतिष्ठान कसबा, श्री गणेश सेवा मंडळ तुरळ सुवरेवाडी, श्री गणेश मंदिर कडवई मादगेवाडी, श्री देव गणपती मंदिर माखजन, गणेश सेवा मंडळ आरवली भुवडवाडी येथील माघी गणेशोत्सव उत्सव मंडळाच्या ठिकाणी भेट देऊन गणेशाचे विधिवत दर्शन घेऊन पूजन केले.

टाइम्स स्पेशल

यावेळी माघी गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी,सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी प्रशांत यादव यांचे आदरपूर्वक स्वागत करून सत्कार केला.या प्रेमाने प्रशांत यादव अक्षरशः भारावून गेले.यादरम्यान त्यांनी अनेकांशी संवाद साधला.तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम ठेवा,मी सदैव तुमच्या बरोबर आहे,असा शब्द देखील दिला.दिवसभर हा कार्यक्रम सुरू होता.यावेळी निवृत्त एसटी स्थानकप्रमुख विश्वास फडके यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत यादव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts