loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये उद्या पाणीटंचाई आराखडा बैठक

खेड (प्रतिनिधी) : तालुक्यात भेडसावणार्‍या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसह नियोजनासाठी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता भरणे येथील श्री काळकाई मंदिर सभागृहात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई आराखडा बैठक पार पडणार आहे. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणारी पाणीटंचाई आराखडा बैठक यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे लांबणीवर पडली होती. जलमिशन योजनेंतर्गत राबवण्यात आलेल्या नळपाणी योजनांसह मिशन बंधार्‍यांमुळे मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. टंचाई आराखडा बैठकीत संभाव्य पाणीटंचाई आराखड्याबाबत चर्चा करून मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, मंडल अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts