loader
Breaking News
Breaking News
Foto

संघर्ष मित्रमंडळ फणसोप रत्नागिरीच्यावतीने माघी गणेशोत्सव २०२५ निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी (जमीर खलपे) : संघर्ष मित्रमंडळ फणसोप रत्नागिरी हे माघी गणेशोत्सवाचे यंदाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. सन २००१ साली फणसोप गावातील मुलांनी एकत्र येऊन संघर्ष मित्र मंडळाची स्थापना करून माघी गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि आज या परंपरेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदाचे २५ वे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करताना मंडळाकडून अवयव दान, नेत्रदान, देहदान याबाबत जनाजगृती होणे या उद्देशाने शासकिय वैद्यकिय महविद्यालय रत्नागिरीचे समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव यांना मंडळाने आमंत्रित केले होते. रेशम जाधव यांनी उपस्थित लोकांना अवयव दान, नेत्रदान, देहदान याची सविस्तर माहिती दिली व जनजागृती केली. सदर कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष सचिन साळवी, संघर्ष मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg