loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या बँकेतील घोटाळा उघड

बँकेतील विविध कामांसाठी राखीव ठेवलेल्या निधीवर बँकेतील अधिकार्‍यांनीच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी एमआयडीसी येथील इंडसइंड बँकेच्या शाखेत घडला आहे. सहा अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बँकेच्या नावे असलेल्या बँक खात्यांमधून आपल्या नातेवाईकांच्या बँक खात्यांवर सुमारे दोन कोटी रुपये वळते केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर, बँक व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडसइंड बँकेच्या अधिकार्‍याने दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेची एकूण सहा खाती असून विविध कामांसाठी या खात्यामधील निधीचा वापर केला जातो. या सहा खात्यांमधील निधी वापरण्याची परवानगी बँकेच्या वेगवेगळ्या विभागांतील १५ अधिकार्‍यांना आहे. बँकेच्या सेंट्रल फ्रॉड मॉनिटरिंग युनिटने केलेल्या चौकशीमध्ये, ३ एप्रिल २०२३ ते ४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत बँकेच्या खात्यांमधून सुमारे दोन कोटी पाच लाख रुपये संशयास्पदरीत्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर वळते करण्यात आल्याचे दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अधिक चौकशी केली असता, सिद्धेश पटनायक या अधिकार्‍याने त्याच्यासह काम करणार्‍या विकी शिंदे याच्या पासवर्डचा वापर केल्याचे दिसून आले. त्याने शिंदे याचा लॉगइन आयडी आणि पासवर्डचा वापर करून अजय यादव, ऋषभ यादव आणि श्यामसुंदर चौहान यांच्या बँक खात्यांवर रक्कम वळती केली आणि नंतर त्यांना काही रक्कम देत उर्वरित रक्कम रोख स्वरूपात घेतली. गैरव्यवहाराबाबत तोंड बंद ठेवण्यासाठी उकळले पैसे आपले इतर सहकारी गैरव्यवहार करत असल्याचे सागर मिश्रा या अधिकार्‍याच्या लक्षात आले. या गैरव्यवहाराबाबत तोंड बंद ठेवण्यासाठी त्याने सिद्धेशकडे पैशांची मागणी केली, त्यानुसार, सागर हा कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र यांच्या नावाने फाइल द्यायचा आणि त्यामध्ये बँक खात्यांचा तपशील नमूद करायचा. त्यानुसार सिद्धेश याने सागरला २९ लाख ३५ हजार रुपये पाठविल्याचे दिसून आले आहे. या अधिकार्‍यांनी पदाचा गैरवापर करून बँकेच्या सहा खात्यांमधून एकंदरीत दोन कोटी पाच लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर वळते केले. बँकेच्या चौकशीत हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर अधिकार्‍याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. या घटनेमुळे बँकेच्या अंतर्गत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार कसा झाला, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts