loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकमित्र एसटी चालक राजेंद्र जाधव यांना अनेक गावकर्‍यांकडून निवृत्तीच्या सदिच्छा शुभेच्छांचा वर्षाव

खेड ( प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा खेड आगारातील एस टी चालक राजेंद्र जाधव निवृत्त झाले. शेवटची एस. टी. खेड साईधाम बिजघर वस्ती साठी आणताना प्रत्येक एसटी थांब्यावर गावकरी सदिच्छा व्यक्त करत आशीर्वाद देत होते. वेरल येथे किमान २५ महिलांनी एसटी थांबवुन राजेंद्र जाधव यांचे औक्षण केले. एन्वरे कुळवंडी सवेनी हेदली येथील गावकरी हात उंचावून मानवंदना देत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बिजघर साईधाम येथे ही एसटी येताच मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी लोकमित्र एसटी चालक राजेंद्र जाधव यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित केलं व उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे जावो अश्या सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी बिजघर सरपंच सौ दर्शना दशरथराव भोसले, शालेय शिक्षण समिती चैरमन व ग्रामदेवता मंदिर पुजारी स्वामी भगवान जंगम, भास्करराव भोसले, संतोष भोसले, मानसी भोसले, व्यापारी कमलेश भोसले, मानसिंग विचारे, संतोष सुतार, आदी मान्यवर उपस्थित होते. उगवतवाडी येथे मराठा समाज नेते नारायणराव बाबाजीराव भोसले, थोरले मानकरी सुनिलराव भोसले यांनी गौरव केला तर तांबडवाडी, कोंड वाडी येथे देखील ग्रामस्थांनी आज निवृत्तीच्या सदिच्छा व्यक्त करत या लोकप्रिय लोकमित्राला सदिच्छा शुभेच्छांचा वर्षाव करत होते. खेड एसटी आगाराने देखील शेवटची एसटी नव वधु सारखी नटून सजून दिली होती. खेड आगार व्यवस्थापक रणजितसिंह राजेशिर्के यांनी त्यांच्या उर्वरित आयुष्य निरोगी सुख समृद्धीच जावो अश्या सदिच्छा व्यक्त केल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts