मालवण (प्रतिनिधी) : चिपळूण सावर्डे येथील कॉलेज ऑफ फार्मसी च्या १९८९ - ९० सालच्या माजी विद्यार्थ्यांचा १२ वा स्नेहमेळावा महाबळेश्वर रेंगडी येथील रिजेंटा ग्रीन लिफ रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमानी साजरा झाला. गेली बारा वर्षे दरवर्षी सातत्याने एकत्र येणारे हे मित्र मैत्रिणी पुन्हा एकदा जुन्या आठवणीत रमून गेले. मैत्रीचे बंध वृद्धिंगत करतानाच या मित्रपरिवाराकडून सामाजिक बांधिलकीही जोपासली जात आहे.
सावर्डे येथील कॉलेज ऑफ फार्मसी च्या १९८९-९० या दोन सालच्या बॅचमधील मित्रपरिवाराचे यापूर्वी मालवण, आंबोली, फये - गारगोटी (कोल्हापूर), चांदोली धरण, दापोली, मीरारोड मुंबई, कोयनानगर, गणपतीपुळे, तोंडवली, आपटी (तापोळा) आदी ठिकाणी स्नेहमेळावे झाले आहेत. या बॅचचे सदस्य व मालवणमधील पारधीये मेडिकलचे मालक दत्तात्रय पारधीये यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या स्नेहमेळाव्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० वर्गमित्र सहभागी होतात. यावर्षी हा स्नेहमेळावा महाबळेश्वर रेंगडी येथे संपन्न झाला. यासाठी वर्गमित्र अशोक पाटील, दत्ता पवार, विजय मोकाशी यांनी व्यवस्था केली. यावेळी विविध कार्यक्रमातून प्रत्येकाने आपल्यातील सुप्त गुणांची झलक दाखवत मजा मस्ती करत आनंद लुटला. या बॅचने स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येतानाच सर्वा वर्गमित्रांच्या सहकार्यातून सामाजिक कार्यासाठी निधी उभारला आहे. प्रत्येक स्नेहमेळाव्यातून काही पैसे गोळा करून हा निधी उभारला जातो. या निधीच्या माध्यमातून ग्रुप मधील आर्थिक संकटग्रस्त तसेच आपत्तीग्रस्त मित्रांना मदत केली जाते. तसेच चिपळूण व महाड येथील पुरात नुकसान झालेल्या मित्रांना मदत करण्यात आली तर शाळा व गरीब विद्यार्थी यांनाही मदत करण्यात येते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.