loader
Breaking News
Breaking News
Foto

आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या महिला आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षापदी : सौ.ज्योती जाधव

दोडामार्ग (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षापदी दोडामार्गच्या नगरसेविका-सौ.ज्योती रमाकांत जाधव यांची नुकतीच नियुक्ती झाल्याचे पत्र प्राप्त झाल्याने दोडामार्ग येथील स्नेह रेसिडेन्सी हॉटेलमध्ये बैठकीत सौ.जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री- नाम.रामदास आठवले यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्यावतीने ही नियुक्ती केल्याचे पत्र महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ऍड.अभयाताई सोनावणे यांनी दिल्याने सौ.जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. बैठकीत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव, जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष-सखाराम कदम, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा -सौ.ज्योती जाधव, तालूका उपाध्यक्ष-सत्यवान पालयेकर, तालूका सहसचिव-नकुळ कांबळे, सौ.जागृती सासोलकर, सौ.सरीता पिळगांवकर, सौ.प्रगती कांबळे, सौ.सेजल कांबळे, सिद्धार्थ कांबळे, सौ.स्नेहल पालयेकर, सौ.शशिकला कदम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संघटनात्मक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg