loader
Breaking News
Breaking News
Foto

मूठभर बिल्डारासाठी कळवा उध्वस्त करण्याचा डाव आखला जात असल्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सत्ताधार्‍यांवर आरोप

ठाणे (प्रतिनिधी) : घरे विकत घेणे परवडत नसल्यामुळे एकीकडे ठाणे, मुंबईमधील मराठी माणूस बाहेर जात आहे, या मराठी माणसाला पुन्हा ठाणे, मुंबईत आणण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. परंतू, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाणे महापालिकेने शहराचा नवीन विकास आराखडा प्रसिद्ध केला. हा विकास आराखडा शहरातील अनेक प्रभागांना उध्वस्त करणारा असल्याचे समजताच हा विकास आराखडा आता, वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. कळव्यातील सुदामा, त्रिमूर्ती, एनएम सोसायटी आणि सह्याद्री या अधिकृत इमारतीच्या परिसरातून रस्त्याचे आरक्षण या विकास आराखड्यात टाकले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे या विकास आराखड्याला येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. गेली अनेक वर्षांपासून या परिसरात मराठी माणूस अस्तित्व टिकवून आहे. या सर्व सोसायटी अधिकृत असून मूठभर बिल्डारासाठी कळवा उध्वस्त करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला. तर, नवीन विकास आराखडा बनवताना कोणत्याही प्रकारे अभ्यास करण्यात आलेला नाही. पालिकेच्या अधिकार्‍यांनी अत्यंत निष्काळजीपणाने हा विकास आराखडा बनवला असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.क्लस्टर योजनेच्या नावाखाली केवळ ठाण्यात दादागिरी सुरु असून नागरिकांची फसवणूक होत आहे. पुढच्याच्या पुढच्या पिढीला क्लस्टरमध्ये घर मिळणार असेल तर, त्या योजनेचा काय फायदा असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts