loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली कळकित नव्याने बांधलेल्या पाखाडीचे उद्घाटन

संगलट (इक्बाल जमादार) : दापोली तालुक्यातील कळकी शिगवणवाडी ते ग्रामदैवतकडे जाणार्‍या पाखाडीचे उद्घाटन उबाठा पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख व दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते पार पडले. विधानसभा निवडणुकीनंतर कदम यांनी मतदारसंघात विकास कामांवर भर दिला आहे तर पक्षाची संघटन बांधणी देखील सुरू आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुकाप्रमुख रूषीकेश गुजर, विजय ठोंबरे, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, दापोली पंचायत समिती माजी. सभापती दिपक खळे, उसगाव गण विभाग प्रमुख रमेश बहीरमकर, अशोक जाधव, जयेंद्र घरवे, शंशिकांत नाचरे, कल्पेश शिगवण, वासुदेव शिगवण, बाबाजी जोगळेकर, राजेंद्र जोगळेकर, अल्पेश शिगवण, बारकू पाते, बारकू खांडे, वासुदेव शिगवण, मनिष खळे, अनंत खांडे, बाळकृष्ण खांडे, दिनेश शिगवण, मंगेश शिगवण, रुपेश जावळे, पांडुरंग यद्रे तसेच सर्व आजी माजी शिवसैनिक युवासैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts