loader
Breaking News
Breaking News
Foto

४० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हर्णे बंदरातील जेट्टीच्या कामाला अखेर सुरुवात

दापोली (वार्ताहर) : ४० वर्षाच्या बहुप्रतीक्षेनंतर हर्णे बंदरातील जेट्टीच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून मच्छीमार बांधवांमधून समाधान व्यक्त होत आहे. गेले ४० वर्षांपूर्वी मंजूर झालेले हर्णे जेट्टीचे काम लाल फितीत अडकली होते. यासाठी स्थानिक तसेच जिल्हाभरातील मच्छिमार बांधवांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. मात्र गेली अनेक वर्ष त्यांच्या या लढ्याला यश येत नव्हते. अखेर दापोलीचे तत्कालिन आमदार व विद्यमान गृहराज्यमंत्री नाम. योगेश कदम व खा. सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यानंतर या कामाला गती प्राप्त झाली आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने येथील मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सदर जेट्टीचे काम हे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून होत असून ४० वर्षांचे स्वप्न साकार होत असल्याने हर्णे बंदर सुसज्ज होण्याच्या मार्गावर असल्याची भावना मच्छिमार बांधवांमध्ये बोलताना दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण किनारपट्टीवर करोंडोंची मासेमारीची उलाढाल होणारी अनेक बंदरे आहेत. या बंदरातून कोट्यावधी रुपयाचे परकीय चलन मिळत असते, परंतु पारंपरिक मासेमारी बंदरात मच्छीमारजेटीचा अभाव असल्याने इथल्या मच्छीमारांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने हर्णे बंदरात जेट्टी मंजूर केली आहे या जेटीच्या कामाला सुरुवात झाल्याने मच्छिमार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारीत अग्रेसर असणार्‍या हर्णे बंदराच्या जेटीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून या कामाला गती आली आहे. ४० वर्षांची जेटीची मागणी आता पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जेटीचे पाहिलेले स्वप्न अखेर साक्षात उतरत असल्याची भावना मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts