loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये माघी गणेश उत्सवनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी देवतांचे देखावे

खेड (वार्ताहर) : सोनारआळी मित्रमंडळ आणि महिला मंडळतर्फे माघी गणेश उत्सवनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी तसेच विविध देवतांचे देखावे ठेवण्यात आले होते. या उत्सवामध्ये बालगणेश, शिवाजी महाराज आकर्षक मूर्ती ठरत होती. या उत्सवामध्ये मंडळतर्फे सत्यनारायण महापूजा व संध्याकाळी महाप्रसाद आयोजित केला होता. या महाप्रसादामध्ये मंडळाचे अध्यक्ष वैभव खेडेकर, उपाध्यक्ष उदय गुहागरकर, सचिव स्वप्निल वनारे, सहसचिव तुषार कारंजकर, खजिनदार निलेश पिंपळकर, सह खजिनदार स्वरूप दांडेकर, मंडळाचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून उत्साहात पार पडला. यामध्ये अन्नदाते व व्यापारी बंधू यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला तसेच धार्मिक गीत गायनाचा कार्यक्रम करण्यात आला. या मंडळातर्फे ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा गणेश भक्तांनी आस्वाद घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts