loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ.वर्षा मोहिते तर उपाध्यक्षपदी श्री. दिनेश खवळे

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्गनगरीच्या अध्यक्षपदी सौ. वर्षा मोहिते तर उपाध्यक्षपदी दिनेश खवळे यांची निवड झाली आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष राजेश चव्हाण व उपाध्यक्ष श्रीमती अनघा तळावडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची सभा रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी पतसंस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा सहकारी संस्था, सिंधुदुर्ग या कार्यालयाचे अधिकारी श्रीकृष्ण मयेकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अध्यक्षपदासाठी श्रीमती वर्षा मोहिते व बाळकृष्ण तु. रणसिंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर उपाध्यक्ष पदासाठी दिनेश खवळे व अमित गंगावणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये श्रीमती वर्षा मोहिते यांना १० मते तर बाळकृष्ण रणसिंग याना ५ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये दिनेश खवळे यांना १० मते तर अमित गंगावणे यांना ४ मते मिळाली व १ मत अवैध ठरले. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीमती वर्षा मोहिते व उपाध्यक्षपदी दिनेश खवळे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण मयेकर यांनी घोषित केले. यावेळी संस्थेचे संचालक श्रीकृष्ण आडणेकर, राजेश चव्हाण, श्रीमती अनघा तळावडेकर, वासुदेव वरवडेकर, वंदन गावडे, देविदास आडारकर, चेतन गोसावी, प्रवीण सावंत, राजेंद्र शिंगाडे, विलास चव्हाण, राजन साळुंखे व सचिव निलेश कुडाळकर उपस्थित होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड झाल्यानंतर सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच कर्मचारी वृंदाच्या वतीने निलेश कुडाळकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts