loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी भोमवाडी येथील तिलारी डाव्या कालव्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण, गोवा राज्यात पाणी पुरवठा पूर्ववत

दोडामार्ग (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात साटेली भेडशी भोमवाडी येथे कालव्याच्या भरावाखाली असलेल्या मोरीचे पाईप खचल्यामुळे मोठे भगदाड पडून पाणी शेती बागायती जमीन घरात शिरले होते. रस्ता बंद होऊन गोवा राज्यात होणारा पाणी पुरवठा बंद झाला होता. अखेर तिलारी कालवा विभाग कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने दुरुस्ती कामाला सुरुवात केली होती. नुकतेच हे दुरुस्ती काम पूर्ण केले. यानंतर सोमवारी दुपारी दोन वाजता गोवा राज्यात डाव्या कालव्यातून पाणी पुरवठा दुपारी दोन वाजता पुर्ववत सुरू झाला. मंगळवारी पहाटेपर्यंत डिचोली तालुक्यातील अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होणार आहे. पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी बांधव यांची चिंता मिटली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या २४ जानेवारी रोजी सकाळी साटेली भेडशी भोमवाडी येथे सप्टेंबर महिन्यात दुरुस्ती केलेल्या ठिकाणी खालच्या बाजूला भरावाखाली असलेल्या मोरीचे पाईप पाणी गळती सुरू होऊन दाबला गेले आणि माती भराव वाहुन जावून कालव्याला मोठे भगदाड पडले होते. यामुळे दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यात तसेच डिचोली पेडणे गोवा तालुक्यातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता याचा परिणाम गोवा राज्यात जाणवू लागला होता. जलशुद्धीकरण प्रकल्प याला फटका बसला होता. जलसंपदा विभाग कालवा विभाग कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी तातडीने हालचाली सुरू करून दहा दिवसांच्या आत पाणी पुरवठा सुरू करून उन्हाळी हंगामात शेती पिकाना फटका बसू नये यासाठी युध्द पातळीवर दुरुस्ती कामाला सुरुवात केली होती. भेडशी येथील ठेकेदार दत्ताराम टोपले यांनी आपली सर्व यंत्रणा कामाला लावून कालवा फुटला त्याच दिवशी सायंकाळी मशिनरी आणून साफसफाई तसेच इतर कामाला सुरुवात केली होती. साटेली भेडशी भोमवाडी येथे कालवा फुटला तेथील जूने पाईप बाहेर काढून त्या ठिकाणी नवीन सिमेंट पाईप टाकून सिमेंट कॉंक्रिट टाकण्यात आले. यानंतर तुटलेला भाग काढून त्या ठिकाणी नवीन माती भराव टाकून मशीन लावून दाब दिला या नंतर माती भरावाच्या आतील पाणी जाणार्‍या भागाला सिमेंट कॉंक्रिट करण्यात आले. दोन दिवस ते घट्ट होण्यासाठी ठेवून नंतर या ठिकाणी एल. डी. पी. फिल्म प्लॅस्टिक पसरण्यात आले.

टाइम्स स्पेशल

सोमवारी पाणी पुरवठा सुरू केला जाईल असे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सकाळी नऊ वाजता डाव्या मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात आले. सुरूवातीला पेडणे तालुक्यातील उजव्या कालव्यात पाणी प्रवाह सोडण्यात आला आणि दुपारी दोन वाजता साटेली भेडशी भोमवाडी येथे दुरुस्ती केलेल्या डाव्या कालव्यातून पाणी पुरवठा सुरू केला. हे पाणी सोमवारी सायंकाळी उशिरा गोवा हद्दीत दाखल होऊन मंगळवारी सकाळी हे पाणी डिचोली, साळ, खरपाल, कासारपाल लाडफे, नानोडा, अस्नोडा, तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प या ठिकाणी पोहचणार आहे. यामुळे तिलारी कालव्याच्या पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी बांधवाना दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts