loader
Breaking News
Breaking News
Foto

भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह ---

कणकवली(प्रतिनिधी)- सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात मंगळवार 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जाणार आहे. यानिमित्त धार्मिक व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारपासून संपुर्ण भिरवंडे गाव भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. मंगळवार 4 फेब्रुवारी अर्थात माघ शुध्द रथसप्तमी दिवशी दुपारी 2 वा. रामेश्वर मंदिरात घटस्थापना होणार आहे. त्यानंतर अखंडपणे हरिनामाचा जयघोष सुरू होणार आहे. या हरिनाम सप्ताहात स्थानिक ग्रामस्थांबरोबरच मुंबईकर चाकरमानी, पाहूणेमंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून आठ दिवस लाखोंच्या संख्येने भाविक, भक्तगण या हरिनाम सप्ताहाला येवून श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतात. मुंबईसह जिल्ह्याच्या विविध भागातून नामवंत भजनी बुवांची भजने, वारकरी दिंड्या तसेच शाळांचे चित्ररथ हे या सप्ताहाचे आकर्षण असते.

टाईम्स स्पेशल

यावर्षी हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून देवालये संचालक मंडळातर्फे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तर हरिनाम सप्ताहाच्या दुसर्या दिवशीपासून म्हणजेच 5 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत दुपारी 1 ते 3 वा. या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. अखंडपणे हरिनामाचा जयघोष आणि रात्री 12 वा. श्री देव रामेश्वराची सवाद्य पालखी मंदिर प्रदक्षिणा असते. एकूणच सप्ताह कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हरिनाम सप्ताहासाठी अखंड भिरवंडे गाव सज्ज झाला आहे. तरी या हरिनाम सप्ताहाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवालये संचालक मंडळ, भिरवंडे व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg