loader
Breaking News
Breaking News
Foto

तिरवडे तर्फे सौंदळ येथेे दिवसाढवळ्या दागिने चोरीला; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल ---

वैभववाडी (प्रतिनिधी)- तिरवडे तर्फे सौंदळ येथील गजानन परशुराम इंदुलकर ( माळवाडी ) यांच्या घरातून दिवसा अडीच तोळ्याचे दागिने चोरीला गेलेचा प्रकार शनिवारी 1 फेब्रुवारीला सकाळी 11 ते दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान घडला. इंदुलकर दांपत्य मुंबईवरून 3 डिसेंबरला गावी आले होते. शनिवारी सकाळी वाडीत गणेश जयंती कार्यक्रमास गेले होते. या दरम्यान भरदिवसा त्यांच्या घराचा दरवाजा फोडून बेडरूमध्ये बॅगेत ठेवलेल्या सोन्याच्या दोन तोळ्याच्या चार बांगड्या, अर्ध्या तोळ्याचे कानातल्या पट्टया व एक हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. कार्यक्रमावरून परतल्यानंतर इंदुलकर यांना ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी याप्रकरणी सोमवारी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस रणजीत सावंत करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg