loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या दोन रेल्वेगाड्यांचे डबे वाढले ---

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या दोन रेल्वेगाड्यांचेे प्रत्येकी दोन डबे वाढले आहेत. संरचनेत बदल करण्यात आला आहे. हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल - हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेस आणि हजरत निजामुद्दीन - मडगाव - हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला प्रथम श्रेणीचा वातानुकूलित डबा आणि तृतीय श्रेणीचा वातानुकूलित डबा असे दोन डबे कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माहितीनुसार, गाडी क्रमांक 12432 हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला 4 फेब्रुवारीपासून तर, गाडी क्रमांक 12431 तिरुवनंतपुरम सेंट्रल- हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला 6 फेब्रुवारीपासून डबे जोडण्यात येतील. गाडी क्रमांक 22414 हजरत निजामुद्दीन मडगाव द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला 7 फेब्रुवारीपासून तर, गाडी क्रमांक 22413 मडगाव- हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला 9 फेब्रुवारीपासून अतिरिक्त डबे जोडले जातील. डब्यांच्या सुधारित रचनेप्रमाणे प्रथम श्रेणी वातानुकूलित 2 डबे, द्वितीय श्रेणी वातानुकूलित 5 डबे, तृतीय वातानुकूलित 12 डबे, पन्ट्री कार 1 आणि जनरेटर कार 2 अशी असणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts