loader
Breaking News
Breaking News
Foto

मिर्ले येथील झोलाई केलमाई मंदिराचे त्वरित काम सुरू करण्यासाठी ग्रामस्थ व मनसेचा उपोषणाचा इशारा

खेड (वार्ताहर) : खेड तालुक्यातील मिर्ले येथील झोलाई केलमाई मंदिर हे सहा गावचे ग्रामदैवत आहे. सदरील मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सहा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन देवाचे पाणी उतरून सुरू केले आहे. परंतु मिर्ले गावातील काही असंतुष्ट लोकांनी मंदिराच्या बांधकामाला विरोध केला असून, संबंधित खात्याला पत्र व्यवहार करून काम थांबविले आहे. सदर मंदिराची जत्रा यावर्षी मे महिन्यात असून मंदिराचे पावित्र राखून देवांची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणे आवश्यक आहे. तरी थांबलेले काम पूर्ववत सुरू करून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक ११ फेब्रूवारी २०२५ वार मंगळवार रोजी मी स्वत : ग्रामस्थांसह उपोषणास बसणार आहे. याची नोंद आपण घ्यावी, असे आवाहन खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेडचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या समोर केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय अखाडे, मनसे प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, सहा गाव संस्थान कमिटीचे सर्व सदस्य व शेकडो ग्रामस्थ उपविभागीय कार्यालय खेड येथे उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts