loader
Breaking News
Breaking News
Foto

अंजली दमानिया यांनी तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासह घोटाळ्याचा केला मोठा आरोप, राजकीय खळबळ

मुंबई (टाइम्स ब्यूरो) : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय खळबळ उडवून देणारी पत्रकार परिषद सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करीत कृषी मंत्रीपदाच्या काळात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सहीनेच मुंडेंनी हा घोटाळा केला असा आरोप करीत सगळा मिळून २७५ कोटीचा हा घोटाळा असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आरोपानंतर तात्काळ धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीसाठी गेल आहेत. तसेच थोड्या वेळात राज्यमंत्रीमंडळाची बैठक ही होणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाची बैठक होणार असल्याचे समजते. याचवेळी धनंजय मुंडेंवर ३०२ कलम लावण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. आता दमानिया यांचे आरोप फेटाळून लावले जाणार की याबाबत विरोधकांच्या प्रत्यारोपांना सामोरे जावे लागणार? हे काही तासातच समजून येणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts