loader
Breaking News
Breaking News
Foto

खवटीत मटका जुगारावर धाड, दोघांवर गुन्हा

खेड : तालुक्यातील खवटीजवळील रिक्षा थांब्यानजीक मोकळ्या जागेत दोन ठिकाणी सुरू असलेल्या मटका जुगार अड्यांवर धाडी टाकून पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले. या धाडीत दोन हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. नितीन गौतम धोत्रे (३० रा. खवटी-बौद्धवाडी), मंगेश मधुकर दळवी (४५. रा. खवटी-तानाजीवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नितीन धोत्रे हा एका दैनिकातील शुभअंकावर पैसे लावून जुगार खेळवत होता. त्याच्याकडून १,०१० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. मंगेळ दळवी हा देखील दैनिकातील शुभअंकावर पैसे लावून जुगार खेळवित असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९१० रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts