loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, अभिनेते राहुल सोलापूरकरांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची मागणी

अभिनेते राहुल सोलापूरकर यांची एक मुलाखत सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण या मुलाखतीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग सर्वांनाच माहीत असेल. विविध पुस्तकं, कादंबऱ्या यांमधून हा प्रसंग अनेकांच्या वाचनाततही आला असेल. मात्र आता याच प्रसंगावरून एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा दावा केला असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सोलापूरकर यांच्या या वक्तव्यावरून राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “राहुल सोलापूरकर यांचं डोकं फिरलंय, त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका,” असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात म्हणाले.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

“राहुल सोलापूरकर यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं आहे. याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सचिन खरात गट पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे. मुळात यांच्या मनातच बहुजन राजांबद्दल द्वेष आहे, हे त्यांच्या वक्तव्यातून जाणवतं. पण आता भाजप सरकार आल्यापासून यांच्या मनातील खरे विचार उफाळून येत आहेत. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांची ब्राह्मणवादी मानसिकता बाहेर आली. त्यांचं डोकं फिरलय, त्यांना ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा,” असं सचिन खरात म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts