loader
Breaking News
Breaking News
Foto

अंजली दमानिया यांच्या गौप्यस्फोटानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

"शेततळी होती, ती काम झालेली नाहीत. घरकुली विहिरी अशी बरीच प्रकरण त्यात आहेत. हे पाप झाकणार नाही. कोणताही माणूस त्याला जवळ करणार नाही" असं मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडेंबद्दल म्हणाले. भगवान गडाने धनंजय मुंडे यांचा पाठिंबा काढून घ्यावा असं अंजली दमानिया म्हणाल्या. त्यावर त्यांनी पाठिंबा ठेवावा किंवा काढावा आम्हाला काय करायचय? जे काही आहे, ते आज राज्याला दिसतय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

“पहिल्यापासून तो खूपच घोटाळेबाज, लफेडबाज आहे. राज्याला तो मोठा दुर्देवी डाग आहे. गोरगरीबांची, शेतकऱ्यांची, ओबीसींच सहकार्य घ्यायच आणि त्यांच्याच ताटात माती कालवायची हा त्याचा एक पिंड झालेला आहे. गरज आहे तो पर्यंत जवळ घ्यायच, त्यांनाच मग चुरून खायचा. ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. ती आता उघडी पडली. आधी लोक बोलत नव्हते आता बोलायला लागले. या राज्यातला एक मंत्री एवढा भ्रष्टाचार करत असेल, तर सरकार त्याला जवळ करतच कसं? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

नंजय मुंडे यांचे घोटाळे बाहेर काढणार असं तुम्ही म्हणाला होता, यावर सुद्धा मनोज जरांगे पाटील बोलले. “मी आता मागे लागणारच आहे. मी ज्या- ज्या वेळेस मागे लागतो, तेव्हा माणसाला टेकवितोच त्या शिवाय आपण गप नाही बसतं. आपण टेकविणार म्हणजे टेकविणार. त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीने घडवून आणलय. त्याला आता सुट्टी नाही. आज माझ्या काही तपासण्या आहेत. उद्या सुट्टी घेतल्यानंतर मी अंतरवली सराटीत जाऊन दर्शन घेणार, त्यानंतर शहागंज अंकुशनगरला जाणार आहे. त्यामुळे मी आता बरोबर टप्याटप्याने मागे लागतोय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

गोरगरीब शेतकऱ्यांच रक्त नका पिऊ रे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts