loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी संस्थानचे राजे व युवराज यांनी तिरोडा येथे भोसले कुटुंबाच्या श्री देव पाटेकर महाराजांचे घेतले दर्शन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : तिरोडा येथे भोसले कुटुंबाने काल सोमवारी माघ शुद्ध शष्ठी प्रतिवार्षिक प्रमाणे श्री देव पाटेकर महाराज यांचा वाढदिवस खास भोसले कुटुंब यांच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत भोसले व युवराज लखमराजे भोसले यांनीही भेट देऊन दर्शन घेतले. या उत्सवाला हजारो पाटेकर भक्तांनी श्री देव पाटेकर यांचे दर्शन व आशीर्वाद घेतले. यावेळी सावंतवाडी संस्थांचे राजे खेम सावंत भोसले व युवराज लखम सावंत भोसले उभयतांनी श्री देव पाटेकरचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, रवींद्र भोसले व संपूर्ण भोंसले कुटुंबीय आणि तिरोडा ग्रामस्थ यांनी सावंतवाडी संस्थानचे उभयतां राजे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आनंदी वातावरणात मनःपूर्वक सत्कार केला. तत्पूर्वी राजेसाहेब खेम सावंत भोसले व युवराज लखमराजे भोसले यांना ढोल ताशा वाजंत्री सहित भोंसले कुटुंबातील सुहासिनीनी ओवाळून भव्य स्वागत केले. या भक्तिमय कार्यक्रमात खासे कुटुंब, तिरोडा गावच्या सरपंच, उपसरपंच व या दशक्रोशीतील असंख्य पाटेकर भक्त सहभागी झाले होते. सोमवारी रात्रो राजे श्री भवानी शंकर महाराज यांचे मार्गदर्शन, खासेवाडी भजन मंडळाचे संगीत भजन, आतषबाजी व चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा असंख्य भक्तांच्या उपस्थिती शिवभक्त शबर नाटकाचा प्रयोग होऊन कार्यक्रम भावपूर्ण झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts