loader
Breaking News
Breaking News
Foto

नाम.स्व.भालचंद्र अनंत उर्फ भाईसाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण

सावंतवाडी (वार्ताहर) : लोकनेते माजी मंत्री, नामदार स्व. भालचंद्र अनंत उर्फ भाईसाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भाईसाहेब सावंत यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त या अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. माजगाव येथे ’प्रेरणा’ सभास्थळी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या माध्यमातून या सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते. भाईसाहेब सावंत यांच्या भगीनी कुसुम बिल्ये यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री ऍड रमाकांत खलप, माजी शालेय शिक्षणमंत्री आम. दीपक केसरकर, माजी मंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सावंत, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार बाळाराम पाटील, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. दिलीप नार्वेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव माजी प्राचार्य व्ही.बी.नाईक, खजिनदार सी.एल.नाईक, अमोल सावंत, विक्रांत सावंत, रामदासशेठ निळख, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी प्राचार्य व्ही बी नाईक, गुरूनाथ नाईक, गुरूनाथ पेडणेकर, डॉ.प्रवीणकुमार ठाकरे, ऍड शामराव सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टाइम्स स्पेशल

अनावरणानंतर उपस्थित मान्यवरांनी भाईसाहेब सावंत यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. १०१ व्या जयंतीनिमित्त उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, गुरूनाथ पेडणेकर, प्रमोद सावंत, संदिप राणे, काका मांजरेकर, प्रेमानंद देसाई, ऍड. शामराव सावंत, ऍड. नुकल पार्सेकर, चंद्रकांत सावंत, लक्ष्मण नाईक, आत्माराम गांवकर, गितेश पोकळे, सोनाली सावंत, ऍड. रेवती राणे, जगदीश धोंड, संप्रवी कशाळीकर, विभावरी सुकी, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, संजय लाड, सागर नाणोसकर, आदींसह शिक्षण प्रसारक मंडळ, नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अनावरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्या डॉ. सुमेधा नाईक धुरी यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts