loader
Breaking News
Breaking News
Foto

अनेकांना धक्कादायक , मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा ! नाटक-एकांकिका गाजवणाऱ्या तरुण अभिनेत्याचे निधन

मराठी नाट्यक्षेत्रातून एक धक्कादायक बातमी आहे, रंगभूमीवर विशेष सक्रिय असणाऱ्या एका तरुण अभिनेत्याचे निधन झाले. अभिनेता सुबोध वाळणकर असे या अभिनेत्याचे नाव असून हृदयविकाराच्या झटक्याने त्याला जीव गमवावा लागला. सुबोधच्या अशा अचानक जाण्याने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जातो आहे. अलीकडेच एका मानाच्या एकांकिका स्पर्धेत सुबोधच्या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर काहीच दिवसांनी अभिनेच्याचे निधन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अभिनेते-दिग्दर्शक आणि सांस्कृतिक कलादर्पणचे चंद्रशेखर सांडवे यांनी सुबोधविषयीचे हे वृत्त शेअर केले आहे. सांस्कृतिक कलादर्पणच्या फेसबुक पेजवरही या घटनेविषयी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. चंद्रशेखर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, '२१७ पद्मिनी धाम या नाटकातील तरुण तडफदार अभिनेता तसेच यंदाच्या सवाई विजेत्या "चिनाब से रावी तक" या एकांकिकामधील अभिनेत्याचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कै.अभिनेता सुबोध सुरेश वाळणकर यास भावपूर्ण श्रद्धांजली'. ३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली, मात्र याविषयीचा अधिक तपशील समोर आलेला नाही

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts