धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना 161.68 कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटं बोलणं याव्यतिरिक्त काही नाही असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया ज्यावर आक्षेप घेतला ती संपूर्णपणे नियमात आणि शासनाच्या धोरणाला साजेशी होती असंही त्यांनी सांगितलं आहे.
"मागच्या 50 दिवसांपासून वेगवेगळे आरोप केले जात आहेत. पण त्यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काही आरोपींची हत्या झाली असा आरोप त्यांनी केला होता. असे सनसनाटी आरोप केले जात आहेत. स्वतची प्रसिद्धी आणि दुसऱ्याची बदनामी याव्यतिरिक्त काही आढळत नाही. आज 58 दिवस झाले असून, माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु आहे. कोण चालवतं मला माहिती नाही," असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
टाइम्स स्पेशल
पुढे ते म्हणाले की, "नॅनो खतासंदर्भात आरोप करण्यात आला. नॅनो खताच्या वापराबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या देशात नरेंद्र मोदींनी प्रोत्साहन दिल्यानंतर आपलं पहिलं राज्य आहे ज्याने 4 लाख शेतकऱ्यांना नॅनो दिला". अंजली दमानिया यांनी आरोप केला आहे की, 'एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे किती पैसे खातो याबाबत मी आज पुरावे देणार. DBT ही योजना सरकारने काढली होती. या योजनेचे पैसे लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी सरकारने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी एक GR काढण्यात आला होता. १२ एप्रिल २०१८ रोजीचा जीआर मुख्यमंत्र्यांना ही जी ६२ आयटम्सची लिस्ट आहे जे डीबीटी खाली येणार आहे. त्या ६२ आइटमला अॅड करण्याची मुभा ही मुख्यमंत्र्यांना आली आणि म्हणजे यातून काही आइटम वगळू शकत नाही पण मुख्यमंत्री त्यात अॅड करू शकतात. जर यातील काही आइटम वगळायचे असतील तर एक कमिटी बनविण्यात आली होती'
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.