loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल खवटी 1998 दहावी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी 26 वर्षांनी आले एकत्र...

खेड (दिलीप देवळेकर)- न्यू इंग्लिश स्कूल खवटीचे सन 1998 चे दहावीचे सर्व विध्यार्थी -विध्यार्थीनी यांनी आपल्या बॅचचा गेट-टुगेदर आयोजन कर्जत लेक व्हू फार्म या ठिकाणी आयोजित केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपले व्यक्तिगत मनोगत व्यक्त करून आपला 26 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव व्यक्त केला. विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला व्यक्तिगत परिचय दिल्यानंतर आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले. त्यामध्ये शाळेबद्दल असणारे स्नेह आणि आपुलकी जिव्हाळा हा कायम सतत शेवटपर्यंत असाच राहील अशी ग्वाही दिली. जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम या संकल्पनेतून घडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या बॅचचा पहिला गेट-टुगेदर मेळावा मुंबईमध्ये (कर्जत) येथे पार पडला. येणारा पुढचा मेळावा ग्रामीण भागामध्ये होणार आहे असे या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. आपल्या शाळेतून आपल्या हायस्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर बरेच विद्यार्थी सरकारी सेवेमध्ये कार्यरत आहेत अशा सर्व मंडळींचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे आपल्या मधून स्वर्गवासी झालेल्या माजी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवसभराच्या या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. त्याचप्रमाणे महिलांसाठी हळदीकुंकवाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts