loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे स्वरचित मराठी काव्य वाचन स्पर्धा

खेड (वार्ताहर) - कोकण मराठी साहित्य परिषद शाखा खेड व कोमसाप युवाशक्ती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव येथे तालुकास्तरीय स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धा झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी रत्नागिरी व सचिव, मराठी भाषा समिती, रत्नागिरी अरुण मोर्ये, साहित्यिक व जिल्हाध्यक्ष, युवाशक्ती रत्नागिरी, खेड शाखेचे अध्यक्ष राजन दांडेकर, कोमसाप रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष गोविंद राठोड, खेड शाखेचे सचिव जलाल राजपूरकर, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेडचे विश्वस्त भालचंद्र कांबळे, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे इ. मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेमध्ये मोठ्या गटातून इ. 11 वी वाणिज्य मधील दुर्वा सागवेकर हिचा प्रथम क्रमांक तर इ. 11 वी विज्ञानमधील स्वानंदी शिर्के हिने द्वितीय क्रमांक, तन्वी शिंदे तृतीय क्रमांक, भाग्यश्री केदार हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. तसेच लहान गटातून इ. 9 वी तील अनुराग वाघमोडे याचा प्रथम क्रमांक तर इ. 9 वी तील निषाद शिंदे याने द्वितीय क्रमांक, आस्था सकपाळ हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला तर चैतन्या मोहिते या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ क्रमांक देऊन गौरविण्यात आले. यावेळी युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये यांनी विद्यार्थ्यांना कविता आणि मराठी भाषेतील शब्दांचे बारकावे सांगितले व त्यांनी लिहीलेल्या कविता सादर केल्या. उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी सर्वाना मराठी भाषेत का बोलावे याचे महत्त्व विशद केले. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे मराठी भाषेकरिता आग्रही असतात हे सांगुन मराठी भाषा आता अभिजात भाषा झाल्याने त्याचे महत्व अधिक वाढले असल्याने देशातील भाषा शिकणारे विद्यार्थी आता कोणत्याही विद्यापीठातून शिकू शकतील असे त्या म्हणाल्या. कविता सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. खेड युवाशक्तिचे प्रमुख किशोर धुत्रे यांनी सूत्रसंचालन केले तर जलाल राजपूरकर यांनी आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts