loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईत जगोजागी लोकल थांबल्या

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम रेल्वेचा मोठा खोळंबा होत आहे. त्यातच आता पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या अर्धा तासांपासून माटुंगा रोड ते वांद्रे स्थानकादरम्यान अनेक लोकल थांबलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून मुंबईतील पश्चिम उपनगरीय रेल्वे वाहतूक उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेवर काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने जलद मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत. अनेक प्रवाशांनी याबद्दल ट्वीटरवर तक्रार नोंदवताना दिसत आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts