loader
Breaking News
Breaking News
Foto

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या 13 वर्षांच्या मुलाने तब्बल 30 हून अधिक राउंड फायर केल्याने कोल्हापूर हादरले !

तब्बल 30 हून अधिक राउंड फायरने कोल्हापूर हादरले; घरी काम करणाऱ्या महिलेच्या 13 वर्षांच्या मुलाने चोरली बंदूक, रिव्हॉल्व्हरची किंमत 51,400 रुपये होती आणि त्यात जिवंत काडतुसे भरलेली होती. सुरक्षिततेसाठी त्यांनी हे रिव्हॉल्व्हर घरी ठेवले होते. त्यांच्या घरी एक महिला काम करते. कधीकधी तिचा मुलगाही तिच्यासोबत घरी यायचा. मुलाने कपाटाच्या ड्रॉवरमधून बंदूक चोरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोल्हापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या मुलाने, या व्यक्तीच्या घरातून बंदूक चोरली व त्यानंतर माळरानावर जाऊन 30 हून अधिक राउंड फायर केले. महत्वाचे म्हणजे या मुलाचे वय अवघे 13 वर्षे आहे. हे चोरीचे रिव्हॉल्व्हर चालवण्यासाठी त्याने युट्यूबवरून प्रशिक्षण घेतले होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. गोकुळ शिरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त पोलीस उपअधीक्षक महावीर भाऊ सकले हे गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहराजवळील पसरीचा नगरमध्ये राहत आहेत. त्यांच्या घरातील एका कपाटाच्या उघड्या ड्रॉवरमध्ये जर्मन बनावटीचे .32 बोरचे आर्मिनियस रिव्हॉल्व्हर ठेवण्यात आले होते.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कामवालीच्लाया मुलाने कपाटाच्या ड्रॉवरमधून बंदूक चोरली.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts