loader
Breaking News
Breaking News
Foto

जया बच्चन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संताप, विश्वहिंदू परिषदने केली अटक करण्याची मागणी

महाकुंभ चेंगराचेंगरी नंतर मृतदेह गंगेत फेकले, सपा खासदार जया बच्चन यांचे वादग्रस्त वक्तव्यावर विश्व हिन्दू परिषदेने खासदार जया बच्चन यांना अटक करण्याची मागणी केली आहे. खोटी आणि असत्य विधान करुन खळबळ उडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी विश्व हिन्दू परिषदने केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खासदार जया बच्चन यांनी संसदेच्या बाहेर येऊन माध्यमांशी बोलताना प्रयागराजमध्ये हजारो भाविकांचे मृतदेह गंगेत फेकले त्यामुळे पाणी प्रदूषित झाले.सध्या सर्वात दूषित पाणी प्रयागराज महाकुंभात आहे. हेच दूषित पाणी लोकांपर्यंत पोहोचत आहे. या साठी कोणीही कोणतेही स्पष्टीकरण देत नाही.या प्रकरणावरून सर्वांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात येत आहे. लोकांचे मृतदेह पाण्यात टाकण्यात आले आणि हे लोक जलशक्तीवर संसदेत भाषण देत आहे. असे वक्तव्य दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विश्वहिंदू परिषदने आक्षेप घेतला आहे.

टाइम्स स्पेशल

या वर उत्तर देतांना विहीपचे नेते म्हणाले, महाकुंभ हां श्रद्धेचा आणि भक्तीचा कणा आहे. इथे धर्म, कर्म आणि मोक्षची प्राप्ती होते. कोट्यावधी भाविकांच्या भावना या महाकुंभाशी जोडल्या गेल्या आहे. जया बच्चन यांनी दिलेल्या वक्तव्यावर माफी मागावी. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान जया बच्चन व परिवाराने कुंभ मेळ्यात जाऊन गंगा स्नान केले आहे ,

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts