loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी घाटातील कामाला सुरुवात; रस्त्यावर माती भराव, बॅरिकेड्स लावून रस्ता केला बंद ---

दोडामार्ग (प्रतिनिधी)- गोवा दोडामार्ग तिलारी घाटमार्गे बेळगाव कोल्हापूर जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात धोकादायक जयकर पॉईंट उतारावर रस्ता संरक्षण कठडा खचला होता. यामुळे एस टी बस सेवा बंद झाली आहे. हे काम होणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी नागरीकांची मागणी तसेच प्रवासी वर्ग यांची गैरसोय लक्षात घेऊन खचलेल्या संरक्षण कठडा दुरुस्ती कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. सोमवार पासून तिलारी घाट रस्ता सर्व वाहनासाठी बंद असे पञक काढले होते. पण किरकोळ वाहने सुरू होती. पण मंगळवारी हा घाट पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दोन ठिकाणी रस्त्यावर माती भराव टाकून बॅरल ठेवले आहेत. तर काही ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला आहे. तसेच तिलारी, दोडामार्ग, साटेली भेडशी, इतर ठिकाणी सावधान तिलारी घाट रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे वाहतूक बंद आहे. याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करणारे फलक सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लावले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts