loader
Breaking News
Breaking News
Foto

नांदी परिवर्तनाची...हळदी कुंकू तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमात विधवा स्त्रिया होणार सहभागी; करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांचा क्रांतिकारी निर्णय ---

लांजा-(संजय साळवी) - देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी आजही आपल्या समाजात विधवा स्त्रियांना हळदी कुंकू कार्यक्रमासह इतर सर्वच धार्मिक कार्यक्रमात एक प्रकारे डावलले जाते. त्यांना या कार्यक्रमात ताठ मानेने सहभागी होता येत नाही. त्यांची हीच होणारी अवहेलना लक्षात घेवून त्यांना यापुढे हळदी कुंकूसह सर्वच धार्मिक कार्यक्रमात सामावून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय तालुक्यातील गवाणे गावातील करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांनी घेतला आहे. नुकत्याच झालेल्या वाडीच्या हळदी कुंकू कार्यक्रमात या सर्व उपेक्षित अशा विधवा महिलांना अन्य सुहासिनी स्त्रियांप्रमाणेच वाण देवून खर्‍या अर्थाने या वाडीने तालुक्यासमोर एक आदर्श घालून दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या समाजात अनेक वर्षांपासून विधवा स्त्रियांना उपरोधिक वागणूक मिळते. मात्र आता हळूहळू जग बदलत चालले आहे. अनिष्ट प्रथा्‌ंना फाटा देवून चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला जाणे गरजेचे आहे. याचे चांगले उदाहरण घालून दिले आहे ते गवाणे करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांनी होय. शासनाच्या विधवा प्रथा बंद करणे अध्यादेशचा आदर राखत या वाडीने गेल्यावर्षी हळदी कुंकु कार्यक्रमाच्या निमित्ताने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. एवढ्यावरच न थांबता एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास यानंतर होणारे विधवा पत्नीचे विधी अर्थात कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र गळ्यातून काढणे, आरती उलटी टाकणे असे विधी न करण्याचा क्रांतिकारी निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. तसेच बाराव्या दिवशी नातेवाईकांकडून कपडे (टॉवेल व इतर) दिले जातात. न देता त्या बदल्यात आर्थिक स्वरूपात त्या कुटुंबाला मदत करण्याचाही एक चांगला निर्णय करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांनी घेतला होता. केवळ निर्णय न घेता प्रत्यक्ष त्याची सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. सकारात्मक गोष्टीचा विचार करून करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांनी विधवा महिलांना सर्वच धार्मिक कार्यक्रमात मानाने सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.् याची सुरूवात हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विधवा महिलांना भेटवस्तू देवून त्यांचा सन्मान करून करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

करंबेळेवाडी कोंडवी ग्रामस्थांचा आदर्श पुढे गावांमधील इतर वाड्या घेतील अशी अपेक्षा आहे. या निमित्ताने मुकुंद केशव करंबेळे यांनी या विषयावर सुंदर गीत गायन करून समाजामध्ये प्रबोधन करण्याचे काम केले. दरम्यान, या कार्यक्रमाला गवाणे गावचे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष गोविंद करंबेळे, पोलीस पाटील रविंद्र कोटकर, करंबेळे कोंडवी वाडीचे अध्यक्ष आत्माराम करंबेळे तसेच सर्व पदाधिकारी, महिला मंडळ पदाधिकारी, उपसरपंच सूर्यकांत मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सौ. करंबेळे, मनोहर करंबेळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts