loader
Breaking News
Breaking News
Foto

गिम्हवणे येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न ---

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा गिम्हवणे येथे गिम्हवणे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच पार पडली. गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिक्षण परिषदेसाठी दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, गिम्हवणे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षण परिषदेचे अध्यक्ष सुनील कारखेले यांचे हस्ते शिक्षण परिषदेचे उद्घाटन झाले. या उद्घाटन समारंभात गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे आदींनी गिम्हवणे केंद्रातील शिक्षकांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. चंद्रनगर शाळेतील शिक्षिका रेखा ढमके यांनी इयत्ता चौथीच्या वर्गासाठी इंग्रजी विषयाचा नमुना पाठ सादर केला. अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन विषयावर स्वाती खानविलकर यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षक बाबू घाडीगांवकर यांनी शैक्षणिक पालक सभा- महत्त्व व कार्यवाही या विषयावर सविस्तर विवेचन केले. याशिवाय केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला व आवश्यक त्या बाबतीत मार्गदर्शन केले. गिम्हवणे केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका मुग्धा सरदेसाई यांना त्यांच्या सेवापूर्ती पश्चात निरोगी व आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी गिम्हवणे केंद्राच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन पुनम पाटील यांनी केले. केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शेवटी पुनम जाधव व पूजा अडलवार यांनी सर्वांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts