loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई विद्यापीठाच्या उडान महोत्सवात लांजा महाविद्यालयाचे सुयश ---

लांजा-(वार्ताहर) - संगमेश्वर लोवले येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचा उडान महोत्सव २०२५ मध्ये लांजा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजाने आंतर महाविद्यालयीन महोत्सवात पाचही स्पर्धांमध्ये रौप्य पदक पटकावले. या उडान महोत्सवात पथनाट्य, पोवाडा गायन, पोस्टर मेकिंग, सर्जनशील लेखन आणि वक्तृत्व अशा एकूण पाच स्पर्धा पार पडल्या. या सर्व स्पर्धांमध्ये लांजा महाविद्यालयाचे एकूण १८ विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रौप्य पदक प्राप्त केले. या स्पर्धेसाठी कोकण विभागातील एकूण १८ महाविद्यालये सहभागी झाली होती. या स्पर्धांसाठी आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रमुख आणि रत्नागिरी जिल्हा क्षेत्र समन्व्यक प्रा. रविचंद्र कांबळे व डीएलएलई समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विजेत्या विद्यार्थ्यांना प्रा. विशाखा पावसकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या सर्व स्पर्धांमध्ये रौप्य पदक प्राप्त केल्याबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मंचावरील व सभागृहातील सर्व मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्ये, उपकार्याध्यक्ष सुनिल कुरूप, सचिव महेश सप्रे, सहसचिव राजेश शेट्ये तसेच सर्व संचालक व सल्लागार मंडळ यांच्याकडून डीएलएलई विभागाचे आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुनिल चव्हाण, उपप्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण तसेच सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्याकडूनही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts