loader
Breaking News
Breaking News
Foto

'महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी इतकी मोठी नाही,'अखिलेश यादव उगाच वाढवून सांगताहेत;खासदार हेमामालिनी यांचे वादग्रस्त विधान

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान यावर भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ही घटना तितकी मोठी नव्हती, जितकी वाढवून दाखली जात आहे असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी चेंगराचेंगरीवर सभागृहात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया होताना त्यांनी हे वक्तव्य केलं. महाकुंभमेळ्यात 29 जानेवारीला चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 30 लोकांनी आपले प्राण गमावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चुकीचं बोलणं हे अखिलेश यादव यांचं काम आहे अशी टीका हेमा मालिनी यांनी केली आहे. "खोटी माहिती देणं हे अखिलेश यादव यांचं कामच आहे. आम्हीदेखील कुंभमध्ये गेलो होतो. आम्हीदेखील संगममध्ये स्नान केलं. चेंगराचेंगरीची दु:खद घटना घडली. पण ती इतकी मोठी नव्हती. ती वाढवून सांगितली जात आहे," असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

अखिलेश यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 जण जखमी झाले. सरकार मृतांची खरी संख्या लपवत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना, आज त्यांनी योगी आदित्यनाथ यांना मृतांची खरी संख्या उघड करण्यास सांगितलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

२९ जानेवारीला चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 30 लोकांनी आपले प्राण गमावले.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts