loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळी येथे काडसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने दि. ६ रोजी दर्शन व प्रवचन सोहळा ---

वरवेली (वार्ताहर)- गुहागर तालुका, मार्गताम्हणे व रामपूर परिसर काडसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्या वतीने गतवर्षीप्रमाणे आध्यात्मिक पीठ कणेरी कोल्हापूर येथील प. पु. श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचा दर्शन व प्रवचन सोहळा आयोजित केला आहे. हा आध्यात्मिक सोहळा दि.६ रोजी सांबसदाशिव सभागृह निळकंठेश्वर मंदिर, पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व गुरुबंधू-भगिनींनी याचा लाभ घ्यावा. ४९ वे मठाधिपती कणेरी मठ यांचा कोल्हापूर यांचा आध्यात्मिक सोहळा दर्शन व प्रवचन कार्यक्रमानिमित्त गुरुवार दि. ६ रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजता सांप्रदायिक भजन, सायंकाळी ५ ते ६ वाजता माउलींचे शुभागमन व दर्शन सोहळा, सायंकाळी ६ ते ७ वाजता नियोजित व्यक्तींचा सत्कार व निमंत्रित व्यक्तींचे विचार, रात्रौ ७ ते ९ वाजता प.पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचे आध्यात्मिक प्रवचन व आरती, रात्रौ ९ ते १० वाजता महाप्रसाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts