loader
Breaking News
Breaking News
Foto

युवा कार्य प्रशिक्षणार्थींवर बेरोजगारीची टांगती तलवार; कालावधी वाढवून कायमस्वरूपी नियुक्ती द्या, गुहागरमध्ये तहसिलदारांना निवेदन ---

वरवेली/गणेश किर्वे- गुहागर तालुक्यात युवा कार्य प्रशिक्षणार्थी ६ महिन्यांपूर्वी नेमण्यात आले. त्याच्या सेवेचा कालावधी फेब्रुवारीअखेर संपुष्टात येणार असून त्यांच्यावर बेरोजगारीची टांगती तलवार कायम आहे. त्यांना कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी, अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थींनी गुहागर तहसिलदारांना दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून युवक व युवतीना शासकीय कार्यालयात रोजगारासह मानधन देण्याची सुविधा उपलब्ध केली. यामुळे बेरोजगाराच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला आहे. सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार शासकीय कार्यालयात प्रशिक्षणासह दरमहा मानधनाची सोय करण्यात आली आहे. दरमहा डीबिटी पध्दतीने प्रशिक्षणार्थींच्या खात्यावर मानधनाची रक्कम जमा करण्यात येत आहे. परंतु आता फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपत असल्याने आता ६ महिन्यानंतर काय करायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. युवा प्रशिक्षणार्थींना वार्‍यावर सोडणार नाही असेही जाहीर करण्यात आले होते यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता फेब्रुवारीत प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घेऊन युवा प्रशिक्षणार्थींची पुन्हा नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts