loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळी बाजारपेठेत पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात ---

वरवेली (गणेश किर्वे)- गुहागर तालुक्यातील करोडो रुपयाची उलाढाल असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शृंगारतळी बाजारपेठेत गुहागर तालुका तसेच चिपळूण तालुक्यातील अनेक गावातील ग्राहक या खरेदीसाठी येत असतात. तसेच याच बाजारपेठेतुन गुहागर येथील श्री व्याडेश्वर मंदिर, श्री दुर्गा देवी मंदिर तसेच हेदवी येथील श्री दशभुज गणेश मंदिर, वेळणेश्वर येथील श्री वेळणेश्वर मंदिर व अन्य मंदिरे त्याचप्रमाणे गुहागर येथील स्वच्छ व सुंदर समुद्र किनारा पाहण्यासाठी पर्यटक जात व येत असतात. त्याचप्रमाणे धोपावे व तवसाळ फेरीबोटसाठी या शृंगारतळी बाजारपेठ मधून जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी सतत रहदारी सुरू असते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरक्षितेच्या दृष्टीने उपाय म्हणून पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या वतीने बाजारपेठेतील मुख्य ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी दोन सीसीटीव्ही लावण्यात आले असून अजून दोन सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच असीम साल्हे यांनी दिली. मुख्य बाजारपेठ मध्ये सीसीटीव्ही बसविल्याने एखादा अनुचित प्रकार बाजारपेठ मध्ये घडल्यास तो प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद होऊ शकतो त्यामुळे तपास त्वरित होऊ शकतो. बाजारपेठेत सीसीटीव्ही बसविंल्याने पाटपन्हाळे ग्रामपंचायतचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे त्याचप्रमाणे सर्व सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांचे सर्व वाहन चालक, व्यापारी व ग्राहक यांनी आभार व्यक्त केले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts