loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे महापालिकेचे पेपरलेस कारभारासाठी एक पाऊल पुढे; 1 एप्रिलपासून ई- ऑफिस प्रणाली प्राथमिकरित्या सुरू करणारं? ---

ठाणे- (प्रतिनिधी)- पेपरलेस कारभार व्हावा या उद्देशाने ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये ठाणेकरांना पालिका मुख्यालय किंवा प्रभाग समिती कार्यलयात यावे लागू नये यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात येईल असे आवाहन केले होते. ठाणे महापालिकेच्या कारभारात गतीमानता आणि पारदर्शकता यावी, या उद्देशातून ई- ऑफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या अर्जासह विविध प्रकल्पांच्या प्रस्ताव ऑनलाईनद्वारे हाताळणार असून येत्या 1 एप्रिलपासून ई- प्रणाली लागू करण्यासाठी पालिकेने विविध विभागातील कर्मचार्‍यांना गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन या पध्दतीने कामे केली जाणार आहेत. त्यानंतर टप्याटप्याने ऑफलाईन पध्दत बंद करुन संपूर्ण कारभार हा ऑनलाईन पध्दतीने चालविला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येत्या 1 एप्रिलपासूनच ठाणे महापालिका प्रशासन शासनाच्या एनआयसी या संस्थेच्या माध्यमातून ई-प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. ई- प्रणालीद्वारे विविध प्रस्तावांच्या नस्तींवर संबंधित अधिकारी ऑनलाईनद्वारे मान्यता देणार आहेत. त्यामुळे हे कामकाज कसे करायचे याचे प्रशिक्षण महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना महापालिका मुख्यालय तसेच माजिवडा येथील युआरसीटीच्या कार्यालयात दिले जात आहे. एनआयसी या संस्थेचे चार अधिकारी हे प्रशिक्षण देत असून येत्या 1 एप्रिल पासून नागरी सुविधा केंद्रात ई- प्रणाली सुरू करण्याचा पालिकेने निर्धार केला आहे. यामुळे प्रस्तावाची नस्ती किंवा नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित अधिकार्‍यांनी काय कार्यवाही केली, यावर वरिष्ठ अधिकार्‍यांना देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. अनेकदा विविध प्रस्तावांच्या नस्ती पालिकेतून गायब झाल्याचे समोर आले होते. मात्र, या प्रणालीमुळे नस्ती गायब होण्याचे प्रकार टळणार आहेत. या प्रणालीद्वारे मंजुर झालेले प्रस्ताव तसेच इतर महत्वाचे दस्तऐवज ठाणेकरांना महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. या प्रणालीसाठी महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा एक शासकीय ई मेल आयडी करण्यात आला आहे, या प्रणालीमुळे पालिकेने कागदविरहीत कामकाजाच्या दिशेने पहिले पाउल टाकल्याचे चित्र आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg