loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसैनिकांचा वाढदिवस साजरा; अनोख्या उपक्रमाला अमोल किर्तीकरांची उपस्थिती ---

दापोली (प्रतिनिधी) - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि युवासेना राष्ट्रीय सरचिटणीस अमोल किर्तीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा ममता बिपीन मोरे आणि शिवसेना दापोली तालूका सचिव नरेंद्र करमरकर यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम शिवसेना संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडीच्या उप जिल्हा संघटीका मानसी विचारे, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, शहर प्रमुख संदिप चव्हाण, युवा सेना शहर अधिकारी विक्रांत गवळी, प्रसाद ऊर्फ दादा कळसकर, बिपिन मोरे, बाळू जाधव, निखिल आडविलकर, विजय बाक्कर, अजित दुबळे आदींसह शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांचा वाढदिवस शिवसेना संपर्क कार्यालयात साजरा करुन शिवसेना उपनेते किर्तीकर यांनी शिवसैनिकांना प्रोत्साहन देण्याच्या या त्यांच्या साधेपणामुळे दापोलीत शिवसेना संघटन मजबुतीने वाढण्यास चांगलीच मदत होणार आहे. शिवसेना पक्ष संघटन उभारणीला किर्तीकर यांनी नव्याने जोमात सुरूवात केली असून नजिकच्या काळात येथे शिवसेना संघटन अधिक बळकट झाले तर कोणालाही नवल वाटायला नको. अशा प्रकारची सर्व समावेशक रणनीती किर्तीकर यांनी आखली असुन त्याच रणनीतीचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसैनिकांना मात्र नव्या उमेदीची स्फुर्ती मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg