loader
Breaking News
Breaking News
Foto

वेंगुर्ला येथे 6 एप्रिल रोजी बौद्ध वधू वर पालक परिचय मेळावा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाच्या वतीने साई मंगल कार्यालय सुंदर भाटले बसस्थानक रोड वेंगुर्ले येथे दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते 3.30 वाजेपर्यंत वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, दोडामार्ग तालुके आणि गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वधू वर परिचय मेळावा घेऊन उपवर मुला मुलींना अनुरूप स्थळ निवडता यावे म्हणून हा प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी उद्घाटन, स्वागत व वधू वर मेळावा दुपारी स्नेहभोजन, अध्यक्षांचे मनोगत, समारोप होईल. वधू वर मेळाव्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. वधू वर नोंदणी फी प्रत्येकी दोनशे रुपये राहील वधू-वरा सोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी रुपये 100 असेल. बौद्ध वधू वर यांनी बौद्ध असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. वधू वर यांच्या वयाच्या पुरावा शाळा सोडल्याचा दाखला आणि शैक्षणिक पात्रता गुणपत्रक प्रमाणपत्र यांच्या झेरॉक्स तसेच पासपोर्ट फोटो आवश्यक आहेत असे सावंतवाडी चे अध्यक्ष आयु महेंद्र सावंत, वेंगुर्लेचे अध्यक्ष आयु प्रेमानंद जाधव, कुडाळचे अध्यक्ष अनिल पावसकर दोडामार्ग अध्यक्ष आयु शंकर जाधव व गोवा विभागाचे अध्यक्ष आयु तुकाराम तांबोसकर यांनी आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg