loader
Breaking News
Breaking News
Foto

खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा; उध्दव ठाकरे महायुती सरकारवर बरसले

मुंबई - ‘खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा’ अशी महायुती सरकारची अवस्था झाली आहे, अशी खरपूस टीका करताना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारला सत्तेचा माज आला आहे, असा आरोपही केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर उद्धव ठाकरेंनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मी बुधवारीच तुमची भेट घेणार होतो. पण अधिवेशन उशीरापर्यंत सुरु होतं. पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने निरर्थक अर्थसंकल्प सादर झाला. थापा रुपाने ज्या गोष्टी मारल्या त्याची वाच्यता कुणीही केली नाही. अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

100 दिवसांचा संकल्प या सरकारने केला होता. मात्र किती सूचना कुठल्या खात्याला दिल्या होत्या माहीत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरु आहेत. हमीभाव मिळतच नाही. परदेशी विद्यापीठांना आकर्षित करणं, वनविभाग असे सगळेच मुद्दे आहेत. मात्र अर्थसंकल्पात ठोस उपाय योजना करण्यात आली नाही. 100 दिवसांचा संकल्प कुठेच दिसला नाही, असा टोला उध्दव ठाकरेंनी लगावला.

टाइम्स स्पेशल

100 दिवसांत काय घडलं? तर बीडच्या सरपंचांची हत्या झाली, सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली. स्वारगेट बलात्कार प्रकरण घडलं. मुंबईत रस्ता घोटाळा झाला आहे. कुठल्याही गोष्टींबाबत समाधानकारक उत्तरं नाहीत. कर्जमाफी करणार होते त्याचं काय झालं? लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार होते. त्याचंही काही झालं नाही. नको ती योजना असं बहिणी म्हणतील, अशी वेळ येते की काय? कोरटकर सापडला पण शिक्षा काय होणार? सोलापूरकर फिरतोच आहे. जातीय दंगल नागपूरमध्ये झाली आहे हे मुद्देही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg