loader
Breaking News
Breaking News
Foto

सौगात ए मोदी नव्हे तर सौगात ए सत्ता! उध्दव ठाकरेंची टीका

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ‘सौगात ए मोदी’ वरुन भाजपावर जोरदार टीका केली. तसंच भाजपाने झेंड्यावरचा हिरवा रंग कधी काढणार ते सांगावं किंवा हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं असंही उद्धव ठाकरेंंनी म्हटलं आहे. भाजपचं हे ‘सौगात ए सत्ता’ आहे, अशी टीका त्यांनी केली. मुंबईत गुरूवारी घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले की, आमच्याकडचे काही उडाणटप्पू आहेत ज्यांचा उल्लेख अनिल परब यांनी भाषणात केला होता, ते टोपी घालून सौगात कशी देतात? तेच आता आम्हाला बघायचं आहे. आम्हाला म्हणजे शिवसेनेला मुस्लिम मतं मिळाली, शिवसेना एकच आहे, त्या गद्दार सेनेबद्दल मी बोलत नाही. शिवसेनेला मुस्लिम समाजाने मतदान केल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले आणि त्यांनी एक आवई उठवली होती की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंना मत दिलं तो सत्ता जिहाद आहे. आता मला एका गोष्टीचा आनंद आहे की इथे जे बोंबलत फिरत होते बुरसटेलेले हिंदुत्वादी, बोगस हिंदुत्ववादी यांना पाचर बसली आहे. कारण ‘सौगात ए मोदी’ हा कार्यक्रम भाजपाने हाती घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सौगात ए मोदी हा कार्यक्रम भाजपाने हाती घेतला आहे. 32 लाख कुटुंबाना भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सौगात म्हणजे भेट देणार आहेत. सत्तेसाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात याचं हे एक उदाहरण आहे. हे सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे म्हणायचं, एक है तो सेफ है चा नारा द्यायचा. होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि ईद जवळ आली की त्यांना पुरणपोळी द्यायची असं हे धोरण आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg