loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार 8 पदरी

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लवकरच आठ पदरी होणार आहे. सध्या एक्स्प्रेस वेवर जाण्यासाठी तीन आणि येण्यासाठी तीन अशा सहा मार्गिका असल्या तरी सकाळी आणि रात्री महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूने एक-एक लेन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात एक्स्प्रेस वेवरील प्रवास आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सुमारे 95 किलोमीटर लांबीचा देशातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. सध्या या मार्गावर दररोज 50-60 हजार वाहने प्रवास धावतात. भविष्यात यामध्ये मोठी वाढ होणार असल्याने एमएसआरडीसी खंडाळा घाट सेक्शनमध्ये सुमारे 13 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक उभारत आहे. ही मिसिंग लिंक आठ पदरी असणार आहे. त्यामुळे महामंडळाने आता संपूर्ण एक्स्प्रेस वे आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुण्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गिकेवर एक मार्गिका आणि मुंबईच्या दिशेने येणार्‍या मार्गिकेवर अतिरिक्त एक मार्गिका तयार केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तत्काळ त्याचा अंतिम आराखडा तयार करून निविदा मागविल्या जाणार आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg